ट्रॅक्टरच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 00:52 IST2022-02-24T00:51:33+5:302022-02-24T00:52:25+5:30
निफाड येथील निफाड- पिंपळगाव बसवंत या रहदारीच्या रस्त्यावर बुधवारी (दि.२३) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वाराला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

ट्रॅक्टरच्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार
निफाड : येथील निफाड- पिंपळगाव बसवंत या रहदारीच्या रस्त्यावर बुधवारी (दि.२३) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकल स्वाराला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी १०.४० वाजण्याच्या दरम्यान निफाड-पिंपळगाव बसवंत रस्त्यावर मटण मार्केटसमोर उताराला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरने (क्रमांक एम. एच. ४१ टी २३२०) समोरून येणाऱ्या मोटारसायकलला (क्रमांक एम एच १५ एफ एक्स ४९१०) धडक दिल्याने मोटारसायकलवरील दीपक पोपट गांगुर्डे (४३, रा . बरड वस्ती, निफाड) याचा ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत मृत दीपकचे नातेवाईक सुनील अशोक गांगुर्डे यांनी निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी माळी, पोलीस कॉन्स्टेबल गणोरे हे तपास करत आहेत.