सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 21:01 IST2018-08-12T21:01:11+5:302018-08-12T21:01:35+5:30

कोकणगांव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन मोटारसायकलसह खाली पडलेल्या मोटारसायकलस्वाराचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला .

Motorbike death on the dry road | सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

सुकेणे मार्गावर मोटारसायकलस्वाराचा मृत्यू

ओझरटाऊनशिप : कोकणगांव ते कसबे सुकेणे मार्गावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने कट मारल्यामुळे तोल जाऊन मोटारसायकलसह खाली पडलेल्या मोटारसायकलस्वाराचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला .  रविवारी सांयकाळी ४ वाजेच्या सुमारास बाळासाहेब महादू गायकवाड (४५) राहाणार बेघरवस्ती रेल्वेस्टेशन कसबे सुकेणे हे त्यांच्या मोटारसायकलने (एम एच १५ व्हीडी १९४१) कसबे सुकेणे कडून कोकणगांवकडे जात असतांना या रस्त्यावरील चारी जवळील हाँटेल आमराई समोर आज्ञात वाहनाने मोटारसायकलला कट मारल्यामुळे गायकवाड यांचा तोल जाऊन ते मोटारसायकलसह रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले, त्यांना रूग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला यासंदर्भात ओझर पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास हवालदार यादव करीत आहे

Web Title: Motorbike death on the dry road