धक्कादायक! तिसरी मुलगी झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 11:59 IST2019-06-03T11:49:21+5:302019-06-03T11:59:41+5:30

नाशिकच्या आडगावमध्ये तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

mother killed girl child in nashik | धक्कादायक! तिसरी मुलगी झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या

धक्कादायक! तिसरी मुलगी झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या

ठळक मुद्देनाशिकच्या आडगावमध्ये तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिसरी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून सख्ख्या आईनेच दहा दिवसाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली.नाशिकच्या आडगाव शिवारातील वृंदावन नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

नाशिक - नाशिकच्या आडगावमध्ये तिसऱ्यांदा मुलगीच झाल्याने आईकडून चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिसरी मुलगी झाल्याच्या नैराश्यातून सख्ख्या आईनेच दहा दिवसाच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली आहे. नाशिकच्या आडगाव शिवारातील वृंदावन नगरमध्ये ही घटना उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर महिलेचा पती बाबासाहेब काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी महिला अनुजा काळे हिला आडगाव पोलिसांनी अटक केली आहे. अनुजा हिने खासगी रुग्णालयात मुलीचा गळा आवळला. काळे दाम्पत्याचे हे तिसरे बाळ होते. यापूर्वी त्यांना दोन मुली आहेत, त्यामुळेच तिसरी मुलगी झाल्याने तिच्या आईनेच तिला ठार मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

31 मे रोजी ही घटना उघडकीस आली आहे.  काही वर्षांपूर्वीच काळे यांच्या 12 दिवसांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी दहा दिवसांच्या चिमुकलीचाही मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांना संशय आला. चिमुकलीचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केले असता त्या दहा दिवसांच्या चिमुकलीची डोक्यात काहीतरी मारून तसेच गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. 
 

Web Title: mother killed girl child in nashik