नाशिक विभागाचा मृत्युदर २ तर जिल्ह्याचा २.११ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 01:12 AM2021-09-17T01:12:34+5:302021-09-17T01:13:34+5:30

विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २,११ टक्के आहे.

The mortality rate of Nashik division is 2 percent and that of the district is 2.11 percent | नाशिक विभागाचा मृत्युदर २ तर जिल्ह्याचा २.११ टक्के

नाशिक विभागाचा मृत्युदर २ तर जिल्ह्याचा २.११ टक्के

Next
ठळक मुद्देविभागात ९ लाख ४५ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त; विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के

नाशिक : विभागात आतापर्यंत ९लाख ७१ हजार १२५ रुग्णांपैकी ९ लाख ४५ हजार १३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या ६ हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के तर मृत्युदर २ टक्के असून नाशिक जिल्ह्याचा मृत्युदर २,११ टक्के आहे.

विभागात आतापर्यंत १९ हजार ४९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के असल्याचे आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी. गांडाळ यांनी सांगितले. नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये ६५ लाख ४९ हजार ३७५ अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी ९ लाख ७१ हजार १२५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

इन्फो

नाशिकला कोरोनामुक्तचे प्रमाण ९७.६५ टक्के

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ६ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३ लाख ९७ हजार ४४९ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ९२९ रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्के आहे. आजपर्यंत ८ हजार ६०३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर २.११ टक्के आहे.

 

इन्फो

नंदुरबारला सर्वाधिक मृत्युदर

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ७३३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ लाख ४० हजार १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे. आजपर्यंत २ हजार ५७५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर १.८० टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर विभागात सर्वाधिक म्हणजे २.३६ टक्के आहे. नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत ४० हजार १९० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ हजार २३३ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६१ टक्के असून आतापर्यंत ९५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो

धुळ्यात सर्वात चांगली स्थिती

विभागातील धुळे जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ९८.४१ टक्के तर जिल्ह्याचा मृत्युदर सर्वात कमी १.४५ टक्के आहे. नगर जिल्ह्यात कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९६.३६ टक्के तर मृत्युदर १.९९ टक्के आहे.

Web Title: The mortality rate of Nashik division is 2 percent and that of the district is 2.11 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.