दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 21:01 IST2020-01-05T20:56:55+5:302020-01-05T21:01:38+5:30

दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७  विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याच्या नियमांनुसार परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 

More than two lakh students from Nashik Division apply for Class X examination | दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज

दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज

ठळक मुद्दे नाशिक जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेसाठी 97 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज बारावीच्या परीक्षेला 75 हजार विद्यार्थी होणार प्रविष्ठ

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाºया दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे २ लाख १५ हजार ५९७  विद्यार्थ्यांचे, तर बारावीच्या परीक्षेसाठी सुमारे १ लाख ६६ हजार ८१ विद्यार्थ्यांचे अर्ज नाशिक विभागीय माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही अतिविशेष विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज सादर करण्याच्या नियमांनुसार परीक्षेच्या एक दिवस अगोदरपर्यंत अर्ज सादर करण्याची सवलत उपलब्ध असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 
बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ मार्चला सुरू होणार आहे. यात बारावीच्या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हजार विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, यात नाशिक जिल्ह्यातील ७५ हजार ४५ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. तर दहावीचे २ लाख १५ हजार ५९७ अर्ज प्राप्त झाले असून, यात नाशिक जिल्ह्यातील सुमारे ९७ हजार ३७१ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष के. बी. पाटील यांनी दिली. विशेष परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंत अर्ज करण्याची संधी असल्याने यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले असून, मंडळाने विभागातील चारही जिल्ह्यांत परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. परीक्षेचे  अंतिम वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून, बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. राज्य मंडळाकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असून, प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे स्वतंत्रपणे नियोजन करण्यात आले आहे.  संबंधित वेळापत्रक परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. 

Web Title: More than two lakh students from Nashik Division apply for Class X examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.