शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

डिसेंबरमध्ये १९ हजारांहून अधिक दस्त नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:10 IST

नाशिक : बांधकाम व्यवसायातील मरगळ झटकण्यासोबतच या व्यवसायावर आधारित सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्य उत्पादक उद्योगांना उभारी ...

नाशिक : बांधकाम व्यवसायातील मरगळ झटकण्यासोबतच या व्यवसायावर आधारित सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्य उत्पादक उद्योगांना उभारी देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली ३ टक्के सवलतीची मुदत गुरुवारी (दि. ३१) संपुष्टात आली आहे; मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांनी घरखरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने तीन टक्के सवलत दिल्याने डिसेंबर २०२० अखेर ४२० कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य निर्धारित केले असताना तब्बल ४७३ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिकांनी गुरुवारी जिल्ह्यातील सातही उपनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी करून तीन टक्के मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करून पुढील चार महिन्यांत दस्त नोंदणी प्रक्रिया करण्याची संधी प्राप्त केली आहे. दरम्यान, ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेऊ न शकलेल्या ग्राहकांसाठी ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत मिळणार आहे. या कालावधीत दस्त नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना चार टक्के मुद्रांक शुल्क भरून खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येणार आहे. दरम्यान, व्यवहार पूर्ण झालेले ग्राहक कागदपत्रांची पूर्तता आणि वेगवेगळ्या तांत्रिक कारणांनी दस्त नोंदणी करू शकत नसल्याने, त्यांनी आता मुद्रांक शुल्क भरून उर्वरित प्रक्रिया पुढील १२० दिवसांत पूर्ण करून तीन टक्के सवलत मिळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक ग्राहकांचा मुद्रांक शुल्क भरण्याकडे कल दिसून आल्याने उपनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी दिसून आली. दस्त नोंदणी करणारे ग्राहक आणि मुद्रांक शुल्क जमा करणाऱ्यांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सातही मुद्रांक शुल्क कार्यालये सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी सांगितले.

इन्फो -

मुद्रांक शुल्क वसुली

महिना - दस्त संख्या - वसुली

एप्रिल - ००० - ०००

मे - २२४७ - १७ कोटी ३६ लाख

जून - ८०१३ - ५३ कोटी ८० लाख

जुलै - १०,५२९ - ६६ कोटी

ऑगस्ट -१०,५०२ - ६१ कोटी ८७ लाख

सप्टेंबर - ११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख

ऑक्टोबर - १३,३६२ - ६८ कोटी २१ लाख

नोव्हेंबर - १२,६५९ - - ६६ कोटी १८ लाख

डिसेंबर - १८,८९७ - ८६ कोटी १८ लाख

(फोटो क्रमांक ८१,८२)