अश्लील मॅसेजद्वारे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 16:53 IST2018-11-18T16:52:45+5:302018-11-18T16:53:09+5:30
नाशिक : मोबाइलवर अश्लील संदेश व फोटो पाठवून तसेच पाठलाग करणाऱ्या संशयिताविरोधात अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़

अश्लील मॅसेजद्वारे महिलेचा विनयभंग
ठळक मुद्देअंबड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल
नाशिक : मोबाइलवर अश्लील संदेश व फोटो पाठवून तसेच पाठलाग करणाऱ्या संशयिताविरोधात अंबड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे़
अंबड लिंक रोडवरील उपेंद्रनगर परिसरातील एका महिलेस ७०८३६९७२९५ या मोबाइल क्रमांकावरील संशयिताने ११ ते १६ नोव्हेंबर या कालावधित अश्लील संदेश व फोटो पाठवून सोबत वाईट कृत्य करण्याची मागणी केली़ यानंतर महिलेची इच्छा नसताना मैत्री करण्यासाठी मोबाइल तसेच पाठलाग करून विनयभंग केला़
याप्रकरणी पीडित महिलेने अंबड पोलीस ठाण्यात धाव धेऊन तक्रार केली़