देवळाली कॅम्पला सामाईक रस्त्याच्या वादातून  महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:16 IST2018-10-24T00:15:48+5:302018-10-24T00:16:02+5:30

सामाईक रस्त्याच्या वादातून नानेगाव येथील विवाहित महिलेच्या चुलत दीराने विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे.

 Molestation of woman in Devloli camp | देवळाली कॅम्पला सामाईक रस्त्याच्या वादातून  महिलेचा विनयभंग

देवळाली कॅम्पला सामाईक रस्त्याच्या वादातून  महिलेचा विनयभंग

देवळाली कॅम्प : सामाईक रस्त्याच्या वादातून नानेगाव येथील विवाहित महिलेच्या चुलत दीराने विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमनाथ रोकडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर त्यांचा चालक व पत्नी योगिता यांनी माझ्या शेतात घातला त्यावेळी मनाई केली असता, त्यांनी दिवसभर ट्रॅक्टर तिथेच उभा करून ठेवला.  रात्री सोमनाथ रोकडे हे ट्रॅक्टर सुरू करून घेऊन जात असताना मी शेतातून नेण्यास विरोध केला असता त्याने चिडून जाऊन शिवीगाळ करीत, झटापट केली व वाईट वर्तन केले. याबाबत पोलिसांनी सोमनाथ रोकडे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title:  Molestation of woman in Devloli camp