जेलरोड परिसरात शाळकरी मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:28 IST2018-12-15T22:28:15+5:302018-12-15T22:28:22+5:30
नाशिक : शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जेलरोड परिसरात शाळकरी मुलीचा विनयभंग
नाशिक : शालेय विद्यार्थिनीचा पाठलाग करीत धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना जेलरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी जेलरोड परिसरातील गोसावीनगरमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलास उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उपनगर पोलीस ठाण्यात पीडित शाळकरी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार १ डिसेंबर २०१७ ते १२ डिसेंबर २०१८ या कालावधीत संशयित मुलगा हा तिच्या घराजवळ तसेच शाळेत येता-जाता पाठलाग करीत असे़ संशयिताने मुलीस रस्त्यात अडवून प्रेमाची मागणी घालून तुझे दुसºया कुणासोबतही लग्न होऊ देणार नाही तसेच तुझ्या भावाचा अपघात करील अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला़
उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची रवानगी सुधारगृहात केली आहे़