नाशिक : अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून विनयभंग करण्यात आल्याची घटना दातेनगरमध्ये घडली आहे़ राहुल भोसले (रा़ अहिल्याबाई होळकर कॉलनी, शिवाजीनगर, मूळ रा़वाघी, नांदेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे़पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार २० आॅक्टोबर ते २५ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत दातेनगरमधील एका खासगी क्लासमधील अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करीत होता़ यातील एका दिवशी बळजबरीने थांबवून अश्लील इशारे करून विनयभंग केला़
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:20 IST