नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मोबाइल चोरट्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 01:45 AM2021-11-13T01:45:15+5:302021-11-13T01:46:07+5:30

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने तीन दिवसापूर्वी रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली. संशयित सोनू उर्फ काळ्या शबीर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

Mobile thief arrested at Nashik Road railway station | नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मोबाइल चोरट्यास अटक

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मोबाइल चोरट्यास अटक

Next

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस खाक्या दाखवताच त्याने तीन दिवसापूर्वी रेल्वे प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली. संशयित सोनू उर्फ काळ्या शबीर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेला मोबाइल जप्त केला आहे. मनमाड येथील मतीन खान मेहमूद खान पठाण मंगळवारी (दि.९) नाशिकरोड स्थानकातून सेवाग्राम एक्स्प्रेसच्या डी-३ मध्ये चढत असताना त्यांच्या पॅन्टच्या मागील खिशातील साडेसात हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी त्यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भालेराव यांच्या मार्गदर्शनात हवालदार संतोष उफाडे, विलास इंगळे, पोलीस शिपाई महेश सावंत तसेच आरपीएफ गौरव वर्मा हे स्थानकावर गस्त घालत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक चार व एक युवक संशयास्पद हालचाली करत असताना दिसला. त्यांनी संशयित सोनू उर्फ काळ्या शबीर शेख (२४, रा. विष्णूनगर, सिन्नर फाटा, नाशिकरोड) याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पोलीस खाक्या दाखवतात तीन दिवसांपूर्वी त्याने सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाइल चोरल्याची कबुली दिली. रेल्वे पोलिसांनी प्रवासी मतीन खान याचा तीन दिवसांपूर्वी चोरीस गेलेला मोबाइल जप्त केला आहे.

Web Title: Mobile thief arrested at Nashik Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.