पंचवटीत मोबाइल दुकान फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:51 IST2018-08-27T17:50:16+5:302018-08-27T17:51:44+5:30
नाशिक : मोबाइलच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ४८ हजार रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याची घटना मुंबई-आग्रा रोडवरील बळी मंदिराजवळील सरस्वतीनगरमध्ये घडली़

पंचवटीत मोबाइल दुकान फोडले
ठळक मुद्देसरस्वतीनगरमधील घटना : पोलिसांत गुन्हा दाखल
नाशिक : मोबाइलच्या दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी ४८ हजार रुपयांचे मोबाइल चोरून नेल्याची घटना मुंबई-आग्रा रोडवरील बळी मंदिराजवळील सरस्वतीनगरमध्ये घडली़
सुनील झाल्टे (रा़ पंचवटी कारंजा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे सरस्वतीनगरमधील प्रमोद महाजन उद्यानाच्या पाठीमागे एसआरएम मोबाइल विक्रीचे दुकान आहे़ २१ व २२ आॅगस्ट या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकवून दुकानात प्रवेश केला़ यानंतर चोरट्यांनी दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले तसेच विक्रीसाठी ठेवलेले ४८ हजार ९६० रुपयांचे मोबाइल चोरून नेले़
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़