दुचाकीस्वारावर वार करून मोबाइलची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 23:44 IST2018-12-05T23:44:47+5:302018-12-05T23:44:56+5:30

नाशिक : दुचाकीवरील तिघा संशयितांनी एका दुचाकीस्वारास अडवून धारदार शस्त्राने वार करून त्याच्याकडील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनीसमोर घडली़

Mobile robbery by boggling on bikes | दुचाकीस्वारावर वार करून मोबाइलची लूट

दुचाकीस्वारावर वार करून मोबाइलची लूट

ठळक मुद्देसातपूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : दुचाकीवरील तिघा संशयितांनी एका दुचाकीस्वारास अडवून धारदार शस्त्राने वार करून त्याच्याकडील मोबाइल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सातपूर औद्योगिक वसाहतीतील व्हीआयपी कंपनीसमोर घडली़

सातपूर शिवाजीनगरमधील धर्माजी कॉलनीतील रहिवासी अतुल चव्हाण (४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री अडीच वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीवरून सातपूर येथील व्हीआयपी कंपनीसमोरून जात होते. यावेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून अज्ञात तिघे संशयित आले. त्यांनी अतुल चव्हाण याला दुचाकीसह अडवत त्याच्या मोटारसायकलीला लाथ मारली व त्याला खाली पाडून तिघा संशयितांपैकी एकाने आपल्या खिशातून धारदार शस्त्र काढत अतुल चव्हाण याच्या डोक्यावर व कमरेवर वार करून त्याला जखमी केले.

यानंतर एका संशयिताने अतुल चव्हाण यांच्या खिशातील महागडा मोबाइल फोन बळजबरीने हिसकावून नेला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Mobile robbery by boggling on bikes