रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 01:58 IST2022-07-01T01:57:38+5:302022-07-01T01:58:00+5:30

रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे.

Mobile phone thief arrested in Sarait | रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात

रेल्वेत मोबाइल चोरी करणारा सराईत ताब्यात

नाशिकरोड : रेल्वेमध्ये प्रवाशांचे मोबाइलवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत मोबाइल चोराला नाशिकरोडरेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. अफान अब्दुल शेख (रा. मालेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयित सराईत चोराचे नाव आहे. सिडको येथील रामदास कुंभार हे दोन महिन्यांपूर्वी चाळीसगावला जाण्यासाठी रेल्वेस्थानकात पवन एक्स्प्रेसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल लंपास केला हाेता. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रभारी पोलीस अधिकारी महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दीपक निकम, संतोष उफाडे पाटील, शैलेश पाटील यांच्या पथकाने रेल्वेस्थानकावरील चोरट्यांचा शोध घेत होते. दरम्यान, औरंगाबादच्या रेल्वे सायबर सेलने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अफानला ताब्यात घेतले. त्याने त्याचा मित्र नावेद अन्सारी यास सीमकार्ड दिल्याचे सांगितले. नावेदचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता कुंभार यांचा चोरीस गेलेला मोबाईल त्याच्याकडे मिळाला. नावेद अन्सारीने नाशिकरोड, कल्याण, मुंबई येथे गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mobile phone thief arrested in Sarait