मोरवाडीत चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 22:44 IST2019-06-20T22:43:55+5:302019-06-20T22:44:45+5:30
सिडको : मोरवाडी येथे एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला असून, स्फोटामुळे घरातील इतर वस्तूंचेही नुकसान झाले आहे. ...

मोरवाडीत चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट
सिडको : मोरवाडी येथे एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाइलचा स्फोट झाला असून, स्फोटामुळे घरातील इतर वस्तूंचेही नुकसान झाले आहे. या स्फोटामुळे घरात धूर पसरला. मात्र यावेळी मोबाइलजवळ कोणीही नव्हते त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मोरवाडी येथे राहुल आव्हाड या युवकाने त्याचा मोबाइल दुपारच्या सुमारास घरात चार्जिंगला लावला होता. चार्जिंग होत असताना अचानक मोठा आवाज झाला. तसेच घरातच मोठ्याप्रमाणात धुराचा लोट उठला. मोबाइलच्या स्फोटामुळे हा प्रकार घडल्याचे लक्षात येताच घरातील राहुल यांनी मोबाइल बाहेर फेकला. मात्र स्फोटामुळे घरातील इतर वस्तूंचेही नुकसान झाले. घरात मोठा धूर पसरला. राहुल यांनी दीड वर्षांपूर्वीच एमआय या कंपनीचा ३ एस प्राइम हा मोबाइल घेतला होता आणि त्याचा अशा पद्धतीने स्फोट झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.