घोटी : इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोटी येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील नागरिक अवास्तव येत असलेल्या वीज बिलामुळे त्रस्त झाले असून बिल त्वरित कमी करण्याचे तसेच विविध समस्यांवर यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इगतपुरी तालुक्यातील नागरिकांच्या नोकºया गेल्या तसेच उद्योगधंदे बंद पडले असून कित्येक युवकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थितीमध्ये आदिवासी तालुक्यातील जनता वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराबद्दल त्रस्त झाले आहेत. रिडींग न घेता अंदाजे वीजबिल आकारणे, वाढीव कर आकारणे, विलंब आकार, विजेचा लपंडाव थांबणे असे प्रकार थांबवून अवास्तव आलेल्या बिलास कमी करून सुरळीत विद्युत पुरवठा मिळावा अशी मागणी मनसेच्या निवेदनात करण्यात आली आहे.याप्रसंगी महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख संदीप किर्वे यांच्या समवेत, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पूनम राखेचा, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, उपतालुकाध्यक्ष भोलानाथ चव्हाण, शहर उपाध्यक्ष राजेश राखेचा, घोटी शहराध्यक्ष निलेश जोशी , ऋ षी शिंगाडे यांच्यासह महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.विजवितरण कंपनीच्या अवास्तव बिल तसेच अनागोंदी कारभाराने गोरगरीब आदिवासी भागांतील जनता त्रस्त झाली आहे. वितरण कंपनी नागरिकांना वेठीस धरत असून अवास्तव बिले येणे न थांबल्यास नाइलाजाने महावितरण कंपनीच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल.संदीप किर्वे, मनसे, उपजिल्हाप्रमुख.
अवास्तव बिले थांबवण्याची मागणी वीजवितरण कंपनीस मनसेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 18:24 IST
घोटी : इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोटी येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील नागरिक अवास्तव येत असलेल्या वीज बिलामुळे त्रस्त झाले असून बिल त्वरित कमी करण्याचे तसेच विविध समस्यांवर यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
अवास्तव बिले थांबवण्याची मागणी वीजवितरण कंपनीस मनसेचे निवेदन
ठळक मुद्देघोटी : वाढीव बिलांची रक्कम कमी करून विजेचा लपंडाव थांबवा