सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:19 PM2018-09-29T22:19:19+5:302018-09-29T22:20:05+5:30

घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.

MNS flag on Somaj Gram Panchayat | सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

सोमज ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा

Next
ठळक मुद्देनिवडणूक : थेट सरपंचपदी मच्छिंद्र कुंदे

घोटी : इगतपुरी तालुक्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या व चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या सोमज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मच्छिंद्र शंकर कुंदे यांची निवड झाली. या ग्रामपंचायतीवर मनसेचा सरपंच व सर्वाधिक सदस्य निवडून आल्याने या पंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.
शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत सोमज ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत सदस्यपदी यशवंत धोंडू केकरे, सत्यभामा पंढरीनाथ कुंदे, म्हाळसाबाई खंडू कुंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्या नेतृत्वाखाली हे यश संपादन करण्यात आले. किरवे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे, मनसेचे तालुका उपाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश उगले, मुंढेगावचे सरपंच गणेश दळवी, गबाजी पाटील, जनार्दन गतीर, नीलेश जोशी, पिंटू चव्हाण, रवि गतीर, गोविंद जाखेरे, सोमा नाडेकर, भास्कर जाखेरे, नामदेव जाखेरे, गोपाळ जाखेरे, अरु ण जाखेरे, नाना बाबा, सुकदेव जाखेरे आदी उपस्थित होते.

Web Title: MNS flag on Somaj Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.