शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे डिपॉझीटही जप्त धोक्याची घंटा : राज प्रकरण गांभीर्याने घेणार

By admin | Updated: May 17, 2014 00:44 IST

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना पराभव पत्करावा लागलाच; परंतु डिपॉझीटही वाचवता आलेले नाही. शहरात तीन आमदार, महापालिकेत ३९ नगरसेवक असल्याने सत्ता असतानादेखील मानहानीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असून, आता राज कोणती भूमिका घेणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांना पराभव पत्करावा लागलाच; परंतु डिपॉझीटही वाचवता आलेले नाही. शहरात तीन आमदार, महापालिकेत ३९ नगरसेवक असल्याने सत्ता असतानादेखील मानहानीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा मानली जात असून, आता राज कोणती भूमिका घेणार याकडे सार्‍यांचेच लक्ष लागून आहे.लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रदीप पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. ग्रामीण भाग सोडला तर शहरातील चारपैकी तीन मतदारसंघांत मनसेचे वसंत गिते, ॲड. उत्तमराव ढिकले आणि नितीन भोसले हे आमदार आहेत. तसेच पालिकेत सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर आणि भगूरमध्येही मनसे नगरसेवक आहेत. असे असताना डॉ. प्रदीप पवार यांना डिपॉझीट वाचविण्याइतपतही मते मिळालेली नाहीत. एकूण ९ लाख ३७ हजार ४०५ मतदान झाले. त्यापैकी केवळ ६३ हजार ५० मते मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून हेमंत गोडसे निवडणूक लढवित होते. त्यांना २ लाख १६ हजार ६७४ मते मिळाली होती. यावेळेस इतकी तर सोडाच, पाऊण लाख मतेही मनसेला मिळाली नाहीत आणि मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आहे.लोकसभा निवडणुकीतील गोंधळाचा अंदाज राज ठाकरे यांना आल्यानेच आठवडाभरापूर्वी त्यांनी येऊन या निवडणुकीत काय काय चुका झाल्या याची माहिती घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे यांना हे प्रकरण गांभीर्याने घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्याकडून अहवाल मागितला जाण्याची शक्यता असून, त्यानंतरच संंबंधितांची झाडाझडती होण्याची शक्यता आहे.मनसेबरोबरच १३ उमेदवारांचे डिपॉझीट जप्तलोकसभा निवडणुकीत ९ लाख मतदान झाले होते. त्याच्या दहा टक्के मते मिळाल्यास डिपॉझीट वाचणार होते. परंतु छगन भुजबळ वगळता अन्य एकही पराभूत डिपॉझीट वाचवू शकला नाही. डॉ. प्रदीप पवार यांच्याबरोबरच बसपाचे दिनकर पाटील, माकपाचे ॲड. तानाजी जायभावे, आपचे विजय पांढरे आणि अन्य नऊ उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.