१० महिन्यांची लेक मायेला मुकली; विषारी पावडर खाऊन आईने संपविला जीवनप्रवास!
By अझहर शेख | Updated: October 10, 2023 17:14 IST2023-10-10T17:14:33+5:302023-10-10T17:14:48+5:30
पंचवटी कारंजा परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळदेखील व्यक्त होत आहे.

१० महिन्यांची लेक मायेला मुकली; विषारी पावडर खाऊन आईने संपविला जीवनप्रवास!
नाशिक : लग्नाला जेमतेम दोन वर्षे झाले. विवाहितेने एका गोंडस छकुलीला नुकताच जन्म दिला असून ती अवघ्या दहा महिन्यांची असतानाच मातेने विषारी पावडर खाऊन आपला जीवनप्रवास संपविला. पंचवटी कारंजा परिसरात या घटनेने खळबळ उडाली असून नागरिकांत हळहळदेखील व्यक्त होत आहे.
पंचवटी पोलिस ठाणे हद्दीतील पंचवटी कारंजा परिसरातील ज्ञानगंगोत्री अपार्टमेंटच्या सदनिकेत राहणाऱ्या साधना करण सराेज (२४) या विवाहितेने राहत्या घरी रविवारी (दि.८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास गव्हाला कीड लागू नये, यासाठी घरात आणलेले विषारी ‘सेल्फॉस’ नावाचे विषारी पावडरचे सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच तत्काल साधना हिला तीचा दीर शुभम याने जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल केले. यावेळी यावेळी वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून साधना हिला मयत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पाेलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिनेश खैरनार, पाेलिस नाईक निलेश चव्हाण यांनी विवाहितेच्या राहत्या घरी धाव घेतली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत विवाहितेचा पती कर हा पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोलमजुरीची कामे करतो. गेल्या दाेन वर्षांपूर्वीच साधना हिचा करणसोबत विवाह झाला हाेता. तीला दहा महिन्यांची चिमुकली आहे. साधनाने असे टोकाचे पाउल का उचलले? याचा तपास पंचवटी पोलिसांकडून आता केला जात आहे.