अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 10:11 PM2020-01-30T22:11:53+5:302020-01-31T01:03:49+5:30

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.

Mirajal is becoming a premature fund | अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

Next
ठळक मुद्देउदासीनता : बँकेच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कंधाणे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.
बागलाण तालुक्यात माहे आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात फळांपिकांचाही समावेश होता. बळीराजाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला होता.
बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत निधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून नुकसान झालेल्या शेतकºयांनी हेक्टरी ८ हजार, व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय झाला होता. ही मदत २ हेक्टरपर्यंत लागू केली गेली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यासाठी सुधारित अनुदान अंदाजित ६२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
हा निधी तालुक्यातील एका बँकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खाती वर्ग केले जात आहेत. यानुसार कंधाणेतील ४०७ खातेदारांचे ३५ लाख ३८ हजार ८४२ रुपये संबंधित बँकेकडे तहसील कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत. पण संबंधित बँकेकडून अद्यापपर्यंत सदरील रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनांचा सामना करताना दिसत आहे.
सदरील मदतनिधी लवकर वितरित करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. संबंधित शेतकरी वर्ग मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बँक अशी पायपीट करताना दिसत आहे.
आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यातच तोकडी शासन मदत, त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही. अवकाळी निधी वर्ग करण्यासाठी संबंधितांकडे वेळ नाही अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे.
अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यात शासनाने तोकडी मदत जाहीर केलीही पण अद्याप या निधीचा एक रु पयाही आम्हाला मिळालेला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकाºयांनी याबाबत शेतकºयांना दिलासा द्यावा.
- सुरेश बिरारी, शेतकरी

Web Title: Mirajal is becoming a premature fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.