सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 17:31 IST2018-08-11T17:30:40+5:302018-08-11T17:31:24+5:30
नाशिक : अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापानेच बलात्कार केल्याची घटना नाशिकरोडच्या टागोरनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन ३८ वर्षीय सावत्र बापाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
नाशिक : अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र बापानेच बलात्कार केल्याची घटना नाशिकरोडच्या टागोरनगरमध्ये घडली आहे़ या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन ३८ वर्षीय सावत्र बापाविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पीडीत मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या फियार्दीनुसार तिचा दुसरा पती हा टागोरनगरमधील एका सोसायटीत राहतो़ २००९ ते ७ आॅगस्ट २०१८ या कालवधीत नोकरीवर गेल्यानंतर अल्पवयीन मुलगी घरात एकटीच राहत होती़ मुलगी पाचवीत असल्यापासून हा सावत्र बाप तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता़ तसेच या मुलीला याबाबत वाच्यता न करण्याबाबत दमदाटी करीत होता़
पोलिसांनी पिडीत मुलीच्या सावत्र बापाविरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे़