नाशिकरोडला अल्पवयीन मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 18:47 IST2018-10-07T18:47:12+5:302018-10-07T18:47:49+5:30
नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ जान्हवी संदीप धनवटे (रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.

नाशिकरोडला अल्पवयीन मुलीची आत्महत्या
नाशिक : आर्टिलरी सेंटर परिसरातील पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास घडली़ जान्हवी संदीप धनवटे (रा. अंबिका सोसायटी, हरिओमनगर, नाशिकरोड) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जान्हवीने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे़
कॉलेज रोडवरून दुचाकीची चोरी
नाशिक : गंगापूर रोडवरील चैतन्यनगरमधील रहिवासी इंद्रजितसिंह शिंदे यांची २० हजार रुपये किमतीची अॅक्टिवा (एमएच १५, जीसी २२५७) दुचाकी चोरट्यांनी कॉलेज रोडवरील घड्याळाच्या दुकानासमोरून चोरून नेली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसस्थानकात २७ हजारांची चोरी
नाशिक : निफाड येथील काकासाहेबनगर येथील रहिवासी श्यामल कुशारे हे गुरुवारी (दि़४) रेडगावला जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकात आले होते़ रेडगाव बसमध्ये बसत असताना चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतून २७ हजार रुपयांची रोकड चोरून नेली़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतून दुचाकी चोरी
नाशिक : चेतनानगर येथील रहिवासी दिलीप वाजे यांची २० हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, डीडब्ल्यू ४९१८) चोरट्यांनी सिडकोतील दिव्या अॅडलॅबपासून चोरून नेली़ याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.