अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:46 IST2020-02-16T01:45:28+5:302020-02-16T01:46:26+5:30

त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावर खंबाळे शिवारातील एका हॉटेलमध्ये नाशिकच्या एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली असून, ही दोन्हीही मुले तेव्हा अल्पवयीन होती.

Minor girl charged with torture | अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावर खंबाळे शिवारातील एका हॉटेलमध्ये नाशिकच्या एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद पीडित मुलीने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना वर्षभरापूर्वी घडली असून, ही दोन्हीही मुले तेव्हा अल्पवयीन होती. ते हॉटेलमध्ये बसले असताना संशयित युवकाने पीडितेस तो आजारी असल्याने आता जास्त दिवस जगणार नाही. माझी अंतिम इच्छा पूर्ण कर असे सांगत त्याने अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आदित्य प्रदीप वळवी (रा. नाशिक) याच्या विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आधी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, पण गुन्हा घडला ते ठिकाण त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे इंदिरानगर पोलीस ठाण्याकडून तो त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Minor girl charged with torture