दूध संघाच्या सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 18:44 IST2018-12-25T18:43:39+5:302018-12-25T18:44:01+5:30
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

दूध संघाच्या सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू
सिन्नर : येथील माळेगाव औद्योगिक वसाहतीत जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कार्यालयात सुरक्षारक्षकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
पंढरीनाथ मुरलीधर घुले (५७) रा. शिवाजीनगर, सिन्नर असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. दूध संघाच्या कार्यालयात सुरक्षारक्षक म्हणून कामावर असलेले घुले कामावर असतानाच चक्कर येऊन पडल्याने अत्यवस्थ झाले होते. त्यांना तातडीने खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दूध संघाचे व्यवस्थापक नवनाथ सूर्यभान कुदळ यांनी पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ लावणे पुढील तपास करीत आहेत.