अरुणाचलमध्ये वाहन अपघातात मृत्यू झालेल्या दिंडोरीच्या जवानावर लष्करी इतमातात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 13:43 IST2022-02-17T13:39:18+5:302022-02-17T13:43:03+5:30

यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता...

Military cremation on Dindori soldier who killed in road accident in Arunachal Pradesh | अरुणाचलमध्ये वाहन अपघातात मृत्यू झालेल्या दिंडोरीच्या जवानावर लष्करी इतमातात अंत्यसंस्कार

अरुणाचलमध्ये वाहन अपघातात मृत्यू झालेल्या दिंडोरीच्या जवानावर लष्करी इतमातात अंत्यसंस्कार

नाशिक- अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करात देशसेवा करताना वाहन अपघातात वीरमरण आलेल्या दिंडोरी येथील प्रसाद क्षीरसागर, या जवानावर आज (गुरुवार दि.१७) लष्करी इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी क्षीरसागर यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.

क्षिरसागर यांचे पार्थिव सकाळच्या सुमारास दिंडोरी येथे आणण्यात आले होते. यानंतर, टेलिफोन कॉलनी येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास सिडफार्म येथील ग्राउंडवर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले.




यावेळी अमर रहे अमर रहे..., भारत माता की जय.. या घोषणांनी परिसर दूनाणून गेला होता. तसेच हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
 

Web Title: Military cremation on Dindori soldier who killed in road accident in Arunachal Pradesh