नाशिक जिल्ह्यात मायलेकीचा बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 01:59 IST2022-06-03T01:58:43+5:302022-06-03T01:59:42+5:30

जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर जिल्ह्यातील मेंढपाळ असलेल्या मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पपाबाई राजेंद्र गोयकर (वय ३५) व मोनिका राजेंद्र गोयकर (१५, रा. ताजू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत.

Mileki drowned in Nashik district | नाशिक जिल्ह्यात मायलेकीचा बुडून अंत

नाशिक जिल्ह्यात मायलेकीचा बुडून अंत

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव डुकरा शिवारात नगर जिल्ह्यातील मेंढपाळ असलेल्या मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. पपाबाई राजेंद्र गोयकर (वय ३५) व मोनिका राजेंद्र गोयकर (१५, रा. ताजू, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत.

येथील एका विहिरीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी त्या गेल्या असता पाय घसरून मुलगी विहिरीत पडली. आईने मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीही बुडाल्याने दोघींचा अंत झाला. ही घटना गुरुवारी (दि. २) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.

 

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बेलू येथील जीवनरक्षक तुपे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मायलेकींचे मृतदेह बाहेर काढले. ते मृतदेह घोटी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Web Title: Mileki drowned in Nashik district