मध्यरात्री खून झाल्याचा संशय : कॉलेजरोडच्या इमारतीवर आढळला तरुणीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:05 IST2019-01-09T17:02:56+5:302019-01-09T17:05:16+5:30
गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचले. तत्काल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले.

मध्यरात्री खून झाल्याचा संशय : कॉलेजरोडच्या इमारतीवर आढळला तरुणीचा मृतदेह
नाशिक : कॉलजरोडवरील पाटील लेन-४ मधील सत्यमलिला टॉवर या व्यावसायिक अपार्टमेंटच्या टेरेसवर पोलिसांना बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी (दि.८) मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी कुठल्याहीप्रकारची शस्त्र अथवा गळा वगैरे आवळल्याची खूना मृतदेहावर आढळून आल्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे; मात्र हा खून असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कॉलेजरोडवरील सत्यमलिला या तीनमजली अपार्टमेंटच्या टेरेसवर पंचवटी, तपोवन परिसरात राहणाऱ्या पायल जयेश दामोदर (२०) या तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख तरुणीची आई सरला संजय परदेशी (३९,रा.पद्मावती सोसा. तपोवन) यांनी पटविली. एका तरुणाने पोलिसांना अपार्टमेंटच्या टेरेसवर मृतदेह असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचले. तत्काल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन पथकाने काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पुढील तपासाला त्याआधारे गती दिली आहे. पायल ही च्या युवकासोबत राहत होती तो जयेश दामोधर घटनेनंतर शहरातून फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पायलने जयेशसोबत विवाह केला होता का? प्रेमसंबंधातून ते दोघे एकत्र राहत होते का? ज्या सोसायटीच्या टेरेसवर मृतदेह आढळला ती सोसायटी व्यावसायिक असून तेथे कोणीही वास्तव्यास नाही, मग पायल कुणासोबत टेरेसवर मध्यरात्रीच्या सुमारास गेली? मध्यरात्रीपासून जयेश दामोधर हा फरार का झाला? अशा एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलीसांचा पुढे तपास सुरू आहे. पायलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संशयित तीचा प्रियकर (पती) जयेशचा पोलीस शोध घेत आहेत.