उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:50 IST2018-05-31T00:50:00+5:302018-05-31T00:50:00+5:30
आगर टाकळी पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या उपनगर येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

उपनगरला म्हसोबा महाराज यात्रोत्सव
उपनगर : आगर टाकळी पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या उपनगर येथील श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. श्री म्हसोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी पहाटे श्री म्हसोबा महाराज मूर्ती अभिषेक, महापूजा करण्यात आली. त्यानंतर मांडव डहाळ्याचा कार्यक्रम, होमहवन करून ललित व सुप्रिया ओहळ या नवदांपत्याच्या हस्ते सत्यनारायण पूजन करण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यात्रोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात पर पडले. यात्रोत्सवानिमित्त सायंकाळी शेंदुराने रंगवलेल्या रेड्याची मिरवणुकीचा शुभारंभ लोकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय ओहोळ, शंकरगिरी गोसावी, माजी नगरसेविका सुमन ओहोळ, रवींद्र पाटील, राज शेख, राहुल शिंपी, पुजारी खंडेराव जाधव आदींसह नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थ, शोभीवंत वस्तू, रहाटपाळणे, खेळणी आदिंची दुकाने थाटण्यात आली होती. यात्रे निमित्त सायंकाळी परिसरातील रहिवासी सहकुटुंब दर्शनासाठी व यात्रेत सहभागी झाल्याने संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला होता.