वाजे हत्याकांडातील म्हस्केला न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 00:25 IST2022-03-01T00:25:22+5:302022-03-01T00:25:57+5:30
घोटी : नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडातील संशयित संदीप वाजे याच्यासह त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के यास अटक करण्यात आली होती.

वाजे हत्याकांडातील म्हस्केला न्यायालयीन कोठडी
घोटी : नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या हत्याकांडातील संशयित संदीप वाजे याच्यासह त्याचा मावसभाऊ बाळासाहेब ऊर्फ यशवंत म्हस्के यास अटक करण्यात आली होती.
म्हस्के यास न्यायालयाने १३ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी (दि. २८) म्हस्के यास न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळून न्यायालयीन कोठडीत म्हस्के यांची रवानगी केली. दरम्यान, संशयित यशवंत म्हस्के याने पोलीस कोठडीत असताना या घटनेची काही उकल केल्याची चर्चा आहे. अजूनपर्यंत त्याबाबत कुठलीही पुष्टी मिळाली नाही. मात्र, पोलीस तपासाच्या अगदी जवळ येत असल्याचे सांगण्यात येत असून, लवकरच हत्याकांडाचा संपूर्ण उलगडा होईल, अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.