शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी मेटाकुटीस

By admin | Updated: November 16, 2014 02:04 IST

जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी मेटाकुटीस

नाशिक : लोकसभा निवडणूक आटोपून सात महिने, तर विधानसभा होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी, निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी आलेल्या खर्चाची आयोगाकडून कोणतीच तजवीज होत नसल्याने जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी मेटाकुटीस आले असून, मागणाऱ्यांचा लकडा चुकविण्यासाठी त्यांच्यावर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. जोपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांकडून विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण खर्च सादर केला जात नाही, तोपर्यंत आयोगाकडून अनुदान येणार नसल्याचे पाहून तर त्यांची घालमेल आणखीनच वाढली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यासाठी २१ कोटी ९२ लाख रुपये इतका खर्च झाला असून, आयोगाने निवडणुकीपूर्वी काही रक्कम व नंतर काही रक्कम अदा केलेली असली तरी अद्यापही जवळपास तीन कोटी रुपये येणे बाकी आहे. परिणामी प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या खर्चापोटी सुमारे वीस ते तीस लाख रुपयांचे देयके अदा करणे बाकी असल्याने ठेकेदारांनी तगादा लावण्यास सुरुवात करताच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे एकत्रित बिल देण्याचे आमिष दाखवून विधानसभा निवडणुकीतही उधार-उसनवारीवर कामे करून घेतले; परंतु आता विधानसभा निवडणूक होऊन महिन्याचा कालावधी उलटला तरी अधिकाऱ्यांकडून पैसे मिळत नसल्याचे पाहून ठेकेदारांचा धीर सूटत चालला आहे. विधानसभा निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आयोगाने निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुमारे १३ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याने प्रत्येक निवडणूक अधिकाऱ्यांना काही रक्कम अदा करण्यात आली होती. परंतु ती पुरेशी नसल्याने बराचसा खर्च उधारीने करून घेण्यात आला होता. आता पुन्हा तितक्याच रकमेची गरज निर्माण झालेली असताना आयोगाकडून पैशांबाबत काहीच निर्णय होत नाही, या उलट दर दिवशी ठेकेदारांना निवडणूक अधिकाऱ्यांचा उंबरठा झिजवावा लागत असून, त्यांच्या तगाद्याने अधिकाऱ्यांनाही आता तोंड लपवावे लागत आहे. (प्रतिनिधी)