शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 00:10 IST2018-03-24T00:10:43+5:302018-03-24T00:10:43+5:30
सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

शहा विद्यालयात जलदिनी ‘पाणी बचती’चा संदेश
पाथरे : सिन्नर तालुक्यातील शहा येथील श्री भैरवनाथ विद्यालय व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जलदिन साजरा करण्यात आला. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक सुनील गडाख यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व व नियोजन कसे करावे हे सांगितले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित होऊ न देणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे ही काळाची गरज असल्याचे मुख्याध्यापक गडाख यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना उपशिक्षक रमेश रौंदळ यांनी सामुदायिक प्रतिज्ञा दिली. जल है तो कल है, पाणी वाचवा, पाणी जिरवा, झाडे लावा, गोड पाणी जपून वाचवा, पर्यावरणाचे संवर्धन करा, पाणी हेच जीवन यासारखे संदेश फलक तयार करण्यात आले होते. मेधा शुक्ल, बरखा साळी यांनी थर्माकोल, पुठ्ठे, कागदापासून पाण्याचे थेंब, मातीचा आकर्षक रंगवलेला ज्ञान कुंभ बनवला. पाण्याचे प्रतीक असलेले ते थेंब विद्यार्थी व शिक्षकांनी ज्ञानरुपी कुंभात टाकले. प्रत्येक थेंबावर संदेश दिला होता. विद्यार्थी पाण्याचे थेंब बनले होते. पाणी वाचवा, जतन करा असा संदेश यातून देण्यात आला. याप्रसंगी नामदेव कानसकर, शमीरुल्ला जहागीरदार, शिवाजी घोटेकर, सलीम चौधरी, रमेश रौंदळ, बाळासाहेब कुमावत, बाळासाहेब खुळे, जगदीश बडगुजर, रवींद्र कोकटे, राजेंद्र गवळी, नारायण वाघ, नवनाथ पाटील, नितीन जगताप, अलका कोतवाल, मंगला बोरणारे, सुमती मेढे, विश्वनाथ ठोक, सुरेखा गरुळे, सचिन रानडे, नामदेव गुरुळे आदी उपस्थित होते.