शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

घरपट्टीतील गोंधळ आता प्रशासनच निस्तरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:59 AM

महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले

नाशिक : महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले असून, आता ही प्रकरणे प्रशासनच निस्तरणार आहे. विशेषत: अनेक प्रकरणांत सर्वेक्षणातील गोंधळ झालेला असेल तर प्रशासन हे करदात्याला सुनावणीला न बोलविताच दुरुस्ती करून घेणार आहे. त्यामुळे हजारो करदात्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला आहे.  महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणांतर्गत ६२ हजार मिळकतींना घरपट्टीच लागू नसल्याचे आढळले होते. त्यानंतर महापालिकेने अशा इमारतींना नोटिसा देण्याचा धडाका सुरू केला असून, आत्तापर्यंत ४२ हजार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करण्यात आल्या असून,  त्या सुधारित दराने या नोटिसा पाठविण्यात आल्याने अनेक मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदरच्या नोटिसा बजावतानाच सदोष सर्वेक्षण झाल्याचेदेखील आढळत आहे.  ज्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे त्यांनादेखील बेकायदेशीर ठरवणे, चुकीचे क्षेत्रफळ नोंदवणे यांसारखे अनेक प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी तर सर्वेक्षणाला कोणीच न जाताही चुकीचे क्षेत्रफळ दाखवून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत मोठ्या आर्थिक दहशतीचे वातावरण असून, जमेल त्या पद्धतीने नागरिक हरकती घेत आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा हजार हरकती आणि सूचना आत्तापर्यंत प्राप्त झाल्या आहेत.  महापालिकेने दिलेल्या नोटिसांमध्ये गोंधळ आढळत असून, पूर्णत्वाचा दाखला देऊनही महापालिकेने त्या अनधिकृत ठरवल्या आहेत. लाकडी वाड्यांना आरसीसी दाखवण्यात आले आहे. या प्रकारामुळे आता महापालिकेत आलेल्या हरकतींची दखल घेऊन योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच काही ठिकाणी महापालिकेच्या लक्षात आल्यानंतरदेखील करासंदर्भातील सुधारणा करून घेण्यात येतील म्हणजेच संबंधित नागरिकांना नोटिसा पाठवण्याऐवजी प्रशासनच प्रकरणांची छाननी करून उचित कार्यवाही करेल, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.घरपट्टीची जबाबदारी मिळकतधारकाचीचमहापालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी नोटिसा देताना अनेकदा नागरिक महापालिकेच्या जबाबदारीचे स्मरण करून देतात. विशेषत: नगररचना विभागाच्या वतीने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची एक प्रत घरपट्टी विभागाला दिली जात असते. मात्र कोणत्याही नव्या सदनिकेत वास्तव्यासाठी गेल्यानंतर संबंधित नागरिकानेच महापालिकेला पंधरा दिवसांत घरपट्टी लागू करण्याची विनंती करणे आवश्यक असते, असे आयुक्तांनी सांगितले.महापालिकेकडे आलेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारे कर उपआयुक्त सुनावणी घेणार असून, त्यामाध्यमातूनही नागरिकांना कर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेच, परंतु अनेक ठिकाणी प्रशासनच स्वत:च पुढाकार घेऊन सुधारित आदेश देतील, असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे आता नागरिकांना मोठा कर दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकरNashikनाशिक