शिरसोंडी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:28 IST2021-09-02T04:28:44+5:302021-09-02T04:28:44+5:30
याप्रसंगी प्रथम दहा क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात रजनी बळीराम पवार ९२.८३ टक्के ...

शिरसोंडी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गौरव
याप्रसंगी प्रथम दहा क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यात रजनी बळीराम पवार ९२.८३ टक्के प्रथम, पूजा काळू वाघ ८८.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर ॠतुजा सुरेश पवार हिने ८८.३० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला. प्राचार्य पवार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील उच्च शिक्षणातील आव्हाने, स्पर्धा यात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी यापुढे अधिक सतर्कतेने कार्यरत राहून अभ्यास करावा, असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य पद्माकर शेवाळे, नितीन निकम, समाधान बच्छाव, योगेश ठोके, शंकर पवार यांच्यासह गोकुळ सोनवणे, सतीश बोरसे व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक योगेश ठोके यांनी केले. सूत्रसंचालन समाधान बच्छाव यांनी तर आभारप्रदर्शन नितीन निकम यांनी केले.