सिन्नर: शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राजेंद्र महात्मे या शिक्षकाने तालुक्यातील भाटवाडी या खेडेगावात नेबरहुड क्लास शिक्षण आपल्या दारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना थेट अध्यापनाद्वारे ज्ञानार्जनाचा यज्ञ सुरु केला.भाटवाडी या गावातील जवळपास 90 विद्यार्थी महात्मा फुले विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10वी या वर्गात शिकतात. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद झाल्या. गावातील मुलांचे शिक्षण बंद पडले. शहरामध्ये ऑनलाईन शाळा ही कोरोना काळातील शिक्षणाची सोय सुरू झाली. परंतु खेडेगावातील पालकवर्ग विडी मजूर, शेतमजुर, व आदिवासी असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. पालकांना सार्टफोन, इंटरनेट अशी साधने परडवणारी नसल्याने मुले ऑनलाईन शिक्षणा पासुन वंचित राहु लागली. परिणामी ही मुले शेतीची कामे करणे, जनावरे चारणे, मजुरी करणे अशी कामे करू लागाली. विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडु लागल्याने बैचेन झालेल्या या शिक्षकाने पालकांसमोर नेबरहुड क्लासची संकल्पना मांडली. या संकल्पनेत निसर्गाच्या सानिध्यात पारावर, मैदानात, झाडाखाली शिक्षण देण्याची कल्पना पालकांना पटली. यावर्गासाठी कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज् नाही. या क्लास साठी शिक्षकाने स्वखर्चाने मुलांना मास्कचे वाटप केले. मुलांची क्लासला गर्दी होऊ नये म्हणुन 8 ते 10 मुलांचे वर्गानुसार गट केले. सामाजिक अंतराचे पालन करुन क्लास घेतला जातो. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे सर्व पालकवर्ग मुलांना पारावरच्या शाळेत पाठवतात. शिक्षक विद्यार्थांना कठीण असणारे विज्ञान व गणित विषय अगदी सोप्या भाषेत शिकवतात. सर्व वर्गातील विद्यार्थाचे वेळापत्रक बनवुन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे गिरवत आहे. कोरोनाच्या काळात गावातील सर्व विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तकांचे वाटप केले. शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी साधनाची नव्हे तर इच्छेची गरज असते हेच या नेबरहुड क्लास या उपक्रमाद्वारे या शिक्षकाने सिध्द केले. या उपक्रमाची तालुक्यात चांगलीच चर्चा होत असून महात्मे सरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भाडवाडीत भरते पारावरची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:43 IST
सिन्नर: शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील राजेंद्र महात्मे या शिक्षकाने तालुक्यातील भाटवाडी या खेडेगावात नेबरहुड क्लास शिक्षण आपल्या दारी या आगळ्या वेगळ्या उपक्रमाद्वारे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना थेट अध्यापनाद्वारे ज्ञानार्जनाचा यज्ञ सुरु केला.
भाडवाडीत भरते पारावरची शाळा
ठळक मुद्देमहात्मा फुले विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र महात्मेंचा उपक्रम