मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 18:10 IST2018-09-10T18:08:10+5:302018-09-10T18:10:38+5:30
नाशिक : मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणीचे तोंड दाबून विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़९) सायंकाळी घडली़

मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणीचा विनयभंग
ठळक मुद्देसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा
नाशिक : मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणीचे तोंड दाबून विनयभंग करण्यात आल्याची घटना रविवारी (दि़९) सायंकाळी घडली़
पिडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ती टेरेसवर फोनवर बोलत होती़ यावेळी एका पांढरा शर्ट घातलेला एक संशयित तिथे आला व त्याने या तरुणीचे डोळे व तोंड घट्ट दाबले़ या घटनेमुळे घाबरलेल्या तरुणीने आरडा-ओरड करून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिच्या पायावर पाय देऊन दुखापत केली व फरार झाला़
या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़