शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेचे सदस्य सहलीला, अपक्ष नाशिकलाच?

By admin | Updated: April 4, 2017 01:35 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिलच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३) सायंकाळी शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी सहलीला रवाना झाले

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिलच्या विषय समिती सभापती निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३) सायंकाळी शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी सहलीला रवाना झाले, तर शिवसेनेला मदत करणारे दोघे अपक्ष रूपांजली माळेकर व शंकर धनवटे सभापतिपदाचा शब्द सोडविण्यासाठी नाशिकलाच थांबल्याचे समजते. तिकडे कॉँग्रेसच्या सदस्यांचीही सायंकाळी उशिरापर्यंत जुळवाजुळव करण्याचे काम शिवसेना व कॉँग्रेसचे नेते करीत असल्याचे चित्र होते.येथील शासकीय विश्रामगृहावरून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य सहलीला रवाना झाल्याचे समजते. सायंकाळी सहलीला गेलेल्या सदस्यांमध्ये माजी आमदार गटनेते धनराज महाले, सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाट यांच्यासह जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी गटनेते प्रवीण जाधव यांच्यासह काही जणांचा पहिला गट सहलीला रवाना झाल्याचे समजते. भाऊलाल तांबडे यांनी सेनेच्या सहलीला २५ सदस्य उपस्थित असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात सदस्य भास्कर गावित, हेमलता गावित यांच्यासह काही सदस्य सायंकाळी उशिरापर्यंत नाशिकलाच पोहचले नसल्याची चर्चा होती. दुसरीकडे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य शंकर धनवटे व रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर यांनी राज्यमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सभापतिपदाबाबत विचारणा केल्याचे समजते. सोमवारी दिवसभर चर्चेचे केंद्रबिंदू गंगापूर नाक्यावरील एका अपक्ष सदस्याचे निवासस्थान असल्याचे समजते. तिकडे दिंडोरी व पेठ तालुक्यातून शिवसेनेचे सहा जिल्हा परिषद निवडून आल्याने येथून एका सभापतिपदाची मागणी शिवसेना सदस्यांनी केली आहे. त्यातही दुसऱ्यांदा निवडून आलेले भास्कर गावित की माजी आमदार धनराज महाले यांच्यातून एकाची निवड करण्यावरून सेनेच्या नेत्यांची डोकेदुखी वाढल्याची चर्चा होती. शिवसेना व कॉँग्रेसच्या नेत्यांनी कॉँग्रेसच्या आठ सदस्यांची रात्री उशिरापर्यंत जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र होते. (प्रतिनिधी)