शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

By admin | Updated: July 27, 2014 00:20 IST

त्र्यंबकला पाणीपुरवठा योजनेची बैठक

 ंत्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्वांत मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे गौतमी गोदावरी (बेझे) ते त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा योजना वेगात सुरू असून, ते मार्चअखेर पूर्ण होणार आहे. या संपूर्ण योजनेचा उद्देश पालिका पदाधिकारी यांना माहीत व्हावा या उद्देशाने बैठक बोलाविली असल्याचे अधीक्षक अभियंता यांनी बैठकीत प्रारंभीच सांगितले. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे उपस्थित होते.या योजनेची माहिती देताना देवेंद्र लांडगे म्हणाले, सदर पाणीपुरवठा योजना २४ कोटी ८६ लक्ष रुपयांची असून, सुमारे २५ वर्षे शहरातील वाढत्या वस्तीसह सिंहस्थ कुंभमेळा यात्रा जत्रा व दररोजची येणाऱ्या जाणाऱ्यांची लोकसंख्या लक्षात घेऊनच योजना तयार करण्यात आली. बेझे ते त्र्यंबकेश्वरपर्यंत येण्यासाठी तळवाडे, पिंपळद (त्र्यंबक) व गणपत बारीमार्गे सध्याच्या जलवाहिनी शेजारून निलपर्वताजवळील त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या जागेवर आणले जातील त्यांची लांबी ९२७० मीटर असून, या जागेत २.६० दलघफू क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर आणली जाईल.यावेळी अधीक्षक अभियंता देवेंद्र लांडगे, कार्यकारी अभियंता एस. सी. निकम, उपअभियंता डी. व्ही. सोनवणे आदिंसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंते उपस्थित होते. तसेच नगराध्यक्षा यशोदाताई अडसरे, उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, धनंजय तुंगार, संतोष कदम, अनघा फडके, आशा झोंबाड, माधुरी जोशी, यशवंत भोये, तृप्ती धारणे, पंकज धारणे, सुनील अडसरे, मनोज थेटे, अभिजित काण्णव तसेच पालिका अभियंता प्रशांत जुन्नरे आदि उपस्थित होते. यावेळी अनेक नगरसेवकांनी शंका विचारून माहिती करून घेतली. (वार्ताहर)