मनपा अधिकाºयांशी चर्चा : तपोवनातील साधुग्राम जागेची पाहणी जागेचा मोबदला देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:57 IST2018-03-09T00:57:44+5:302018-03-09T00:57:44+5:30
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत प्रशासनाने आरक्षित केलेल्या साडेतीनशे एकर जागेचा तत्काळ मोबदला द्यावा किंवा त्या जागेवर उदरनिर्वाह सुरू ठेवण्यासाठी मनपाने परवानगी द्यावी, अशी मागणी तपोवनातील शेकडो जागामालकांनी केली आहे.

मनपा अधिकाºयांशी चर्चा : तपोवनातील साधुग्राम जागेची पाहणी जागेचा मोबदला देण्याची मागणी
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत प्रशासनाने आरक्षित केलेल्या साडेतीनशे एकर जागेचा तत्काळ मोबदला द्यावा किंवा त्या जागेवर उदरनिर्वाह सुरू ठेवण्यासाठी मनपाने परवानगी द्यावी, अशी मागणी तपोवनातील शेकडो जागामालकांनी केली आहे. बुधवारी महापालिकेच्या अधिकाºयांनी तपोवनातील साधुग्रामच्या जागेची पाहणी केली, त्यावेळी जागामालकांनी मनपाच्या अधिकाºयांची भेट घेऊन कैफीयत मांडली. सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या सुमारे साडेतीनशे एकर जागेवर जागामालकांनी विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीने त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच पंधरा दिवसांत बांधकाम न हटविल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत वर्षभरासाठी जागा आरक्षित केली, परंतु त्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला संबंधित जागामालकांना दिलेला नाही. मोबदला न मिळाल्याने काही जागामालकांनी स्वत:च्या जागांवर उदरनिर्वाहासाठी बांधकाम केले होते, परंतु प्रशासनाने विनापरवाना बांधकाम केले म्हणून नोटिसा बजावल्याने शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला. साधुग्रामची उभारणी करताना विविध सुविधा पुरविण्यासाठी खोदकाम करून कच, खडी टाकण्यात आल्याने शेतजमिनी खराब झाल्याने व त्यातच प्रशासनाने संबंधित जागामालकांना मोबदला न दिल्याने काही शेतकºयांनी जागांवर बांधकाम करून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय सुरू केला आहे. मात्र प्रशासनाने हरकत घेतल्याने शेतकºयांनी जागेचा मोबदला द्यावा किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. बुधवारी (दि. ७) दुपारी तपोवन प्रवेशद्वारावर शेतकरी बांधवांनी एकत्र येत जागा पाहणीसाठी आलेल्या अधिकाºयांशी चर्चा केली.