वैद्यकीय अधिक्षकांना इंदिरा गांधी रुग्णालयात धक्काबुक्की; संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 13:58 IST2021-05-19T13:55:12+5:302021-05-19T13:58:48+5:30
देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की

वैद्यकीय अधिक्षकांना इंदिरा गांधी रुग्णालयात धक्काबुक्की; संशयितास अटक
नाशिक : महापालिकेच्या पंचवटी कारंजा येथिल इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथीच्या रोगाचे काम करत असताना रुग्णालयात प्रवेश करून वैद्यकीय अधिक्षकांना धक्काबुक्की करून शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला. पंचवटी पोलिस ठाण्यात द्वारका येथे राहणाऱ्या एका संघटनेचा पदाधिकारी असलेल्या संशयित मृणाल भालचंद्र घोडके (३३) याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
याबाबत महापालिकेचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय देवकर यांनी तक्रार दाखल केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजता इंदिरा गांधी रुग्णालयात ही घटना घडली. देवकर इंदिरा गांधी रुग्णालयात कोविड साथरोगअंतर्गत सेवा देत असताना संशयित घोडके रुग्णालयात आला आणि म्हणाला 'माझी आई लस घेण्यासाठी आली आहे एवढा वेळ का लागतो, तुम्ही डॉक्टर खूप माजले आहेत' असे म्हणून देवकर यांना त्याने धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करुन रुग्णालयात आरडाओरड करत गोंधळ घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या घटनेनंतर देवकर यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी रात्री घोडके याला अटक केली आहे. घोडके हा एका संघटनेचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.