शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

वैद्यकीय अधिकारी भरतीतून मुलाखत रद्द, गुणवत्तेसह उच्चशिक्षणाचे होणार चीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:04 IST

आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र संचालक तथा आरोग्य आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

ठळक मुद्देकंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश शैक्षणिक पदवी, पदव्युत्तर पदवी व अनुभवाच्या आधारे होणार निवड

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या 2017-18 च्या मंजूर पीआयपीनुसार राज्यात नाशिकसह सातारा, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व पुणो या पाच जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र संचालक तथा आरोग्य आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य आयुक्तांकमंगळवारी (दि.5) बदलीप्रक्रियेतील फेरबदलांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी बुधवारी (दि.6) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्या समवेत बैठक घेऊन भरतीप्रक्रियेतील बदलांविषयी चर्चा केली. या भरतीप्रक्रियेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांत भरावयाच्या 50 पदांसाठी 7 डिसेंबरला ही मुलाखत प्रक्रिया घेण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल झाल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीच्या माध्यमातून अपहार करून लाखो रुपये उकळण्याची आस लावून बसलेल्या यंत्रणोतील भूजंगांचे मनसुबे उधळले गेले आहेत. जिल्ह्यातील मालेगाव- 30, बागलाण- 10, देवळा- 5 व चांदवड- 5 अशी पन्नास पदे भरावयाची आहेत. या पदांच्या भरतीसाठी सुमारे साडेसातशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. परंतु, यातील केवळ 150 उमेदवारांची निवड करून त्यांची अंतिम निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मुलाखतीसाठी 30 गुणांपैकी अधिक गुण मिळविणा:या उमेदवारांची थेट अंतिम निवड करण्यात येणार असल्याने ही भरतीप्रक्रिया वादात अडकली होती. तसेच भरतीप्रक्रियेत लाखो रुपयांचा गैरव्यहार होत असल्याच्या निनावी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची दखल थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी घेतली असून, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. अशी होणार भरती भरतीप्रक्रियेतील बदलांनुसार उमेदवाराची शैक्षणिक पदवी, पदव्युत्तर पदवी व अनुभव यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बीएएमएस पदवीतील सरासरी गुणांना 80 टक्क्यांच्या प्रमाणात ग्राह्य धरून पदव्युत्तर पदवी, 10 टक्के व अनुभवास 10 टक्के असे एकूण 100 गुणांपैकी गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश आरोग्यसेवा आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या भरतीत कोणतीही मुलाखत प्रक्रिया न घेता गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना नियुक्तीचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही आरोग्यसेवा आयुक्तांनी केल्या आहेत. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदNashikनाशिकHealthआरोग्य