वैद्यकीय अधिकारी भरतीतून मुलाखत रद्द, गुणवत्तेसह उच्चशिक्षणाचे होणार चीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 21:04 IST2017-12-06T20:49:06+5:302017-12-06T21:04:04+5:30
आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र संचालक तथा आरोग्य आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

वैद्यकीय अधिकारी भरतीतून मुलाखत रद्द, गुणवत्तेसह उच्चशिक्षणाचे होणार चीज
नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या 2017-18 च्या मंजूर पीआयपीनुसार राज्यात नाशिकसह सातारा, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व पुणो या पाच जिल्ह्यांत आरोग्य उपकेंद्रांच्या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये (हेल्थ अॅन्ड वेलनेस सेंटर) मार्च 2018 अखेर्पयत भरावयाच्या 250 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या भरतीप्रक्रियेतून मुलाखत वगळून उपलब्ध उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे महाराष्ट्र संचालक तथा आरोग्य आयुक्तांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आरोग्य आयुक्तांकमंगळवारी (दि.5) बदलीप्रक्रियेतील फेरबदलांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी बुधवारी (दि.6) जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांच्या समवेत बैठक घेऊन भरतीप्रक्रियेतील बदलांविषयी चर्चा केली. या भरतीप्रक्रियेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यांत भरावयाच्या 50 पदांसाठी 7 डिसेंबरला ही मुलाखत प्रक्रिया घेण्यात येणार होती. परंतु, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल झाल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीच्या माध्यमातून अपहार करून लाखो रुपये उकळण्याची आस लावून बसलेल्या यंत्रणोतील भूजंगांचे मनसुबे उधळले गेले आहेत. जिल्ह्यातील मालेगाव- 30, बागलाण- 10, देवळा- 5 व चांदवड- 5 अशी पन्नास पदे भरावयाची आहेत. या पदांच्या भरतीसाठी सुमारे साडेसातशेहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. परंतु, यातील केवळ 150 उमेदवारांची निवड करून त्यांची अंतिम निवड मुलाखतीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या मुलाखतीसाठी 30 गुणांपैकी अधिक गुण मिळविणा:या उमेदवारांची थेट अंतिम निवड करण्यात येणार असल्याने ही भरतीप्रक्रिया वादात अडकली होती. तसेच भरतीप्रक्रियेत लाखो रुपयांचा गैरव्यहार होत असल्याच्या निनावी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणाची दखल थेट राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांनी घेतली असून, ऐनवेळी भरतीप्रक्रियेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
अशी होणार भरती
भरतीप्रक्रियेतील बदलांनुसार उमेदवाराची शैक्षणिक पदवी, पदव्युत्तर पदवी व अनुभव यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. बीएएमएस पदवीतील सरासरी गुणांना 80 टक्क्यांच्या प्रमाणात ग्राह्य धरून पदव्युत्तर पदवी, 10 टक्के व अनुभवास 10 टक्के असे एकूण 100 गुणांपैकी गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश आरोग्यसेवा आयुक्तांनी दिले आहेत. तसेच या भरतीत कोणतीही मुलाखत प्रक्रिया न घेता गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना नियुक्तीचे आदेश द्यावेत, अशा सूचनाही आरोग्यसेवा आयुक्तांनी केल्या आहेत.