पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर

By Admin | Updated: January 9, 2015 00:37 IST2015-01-09T00:10:56+5:302015-01-09T00:37:58+5:30

पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर

Medical Officer at Pimpkar Kheda is absent | पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर

पिंपरखेडे आरोग्यकेंद्रात वैद्यकीय अधिकारीच गैरहजर


न्यायडोंगरी : जिल्हा आरोग्य अधिकारी नांदगाव तालुक्यात दौऱ्यावर असताना सतत वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहाणाऱ्या पिंपरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्राकडे लक्ष देत नसल्याने परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.
पिंपरखेड, ता. नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच जिल्ह्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे काम करून कर्तव्यतत्परतेचा अभास निर्माण केला खरा, परंतु रविवारी (दि. ४) खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघचौरे हे नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रास भेट देऊन गेले असल्याची माहिती डॉ. ससाणे यांनी दिली. परंतु याच रस्त्यावर काही अंतरावर असलेल्या व नेहमीच वैद्यकीय अधिकारी रहात नसल्याच्या तक्रारी होणाऱ्या पिंपरखेड प्राथमिक आरोग्यकेंद्रास भेट न दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे बातमीची दखल घेऊन तत्काळ नोटीस काढणारे अधिकारी मात्र समोर असलेल्या तक्रारीची शहानिशा टाळत असल्याने गावात तर्कविर्तक केले जात आहेत.(वार्ताहर)

Web Title: Medical Officer at Pimpkar Kheda is absent