शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याबरोबर अजित पवार, तटकरेंचीही नार्को टेस्ट करा

By admin | Updated: January 2, 2015 00:42 IST

जलसंपदातील घोटाळा : गिरीश महाजन यांची मागणी

नाशिक : जलसंपदा खात्यातील घोटाळ्याबाबत येत्या दोन आठवड्यात गौप्यस्फोट करणार असून, याप्रकरणी माझ्यावर झालेल्या आरोपांबद्दल माझ्याबरोबरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांचीही नार्को टेस्ट करावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.सिंहस्थ कामांच्या पाहणीसाठी महाजन हे त्र्यंबकेश्वर येथे आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, जलसंपदातील घोटाळ्याप्रकरणी मला एक ठेकेदार भेटायला आला होता. जलसंपदातील ११०० कोटींच्या कामांसाठी स्थगिती देण्यात आली होती. त्यावेळी १०० कोटींची आॅफर मला संबंधित ठेकेदाराकडून देण्यात आली होती. याप्रकरणाच्या फायली आमच्या ताब्यात असून, जलसंपदातील घोटाळे येत्या दोन आठवड्यात उघड  करून प्रकरणे बाहेर आणू असेही महाजन यावेळी म्हणाले. ज्या ज्या कंत्राटदारांनी मला एसएमएस केले, त्याचीही माहिती माझ्याकडे उपलब्ध असून, त्याचीही खातेअंतर्गत चौकशी करण्यात येईल. या खात्यात २० ते २४ टक्क्यापर्यंत लाच दिली जात होती अशी पुष्टी त्यांनी जोडली.यानंतर मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत महाजन यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी १०० कोटींची लाच देऊ पाहणाऱ्या ठेकेदाराचे नाव महाजन जाहीर करणार नसतील तर त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे. त्यावर बोलताना महाजन यांनी माझ्याबरोबर अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही माझ्याबरोबर नार्को करा. त्याचबरोबर जलसंपदाचे दोन वरिष्ठ अधिकारी व चार ठेकेदारानाही नार्को टेस्टसाठी बोलवावे जेणेकरून या सगळ्या घोटाळ्याचे सत्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. महाजन यांच्या आवाहनावर मात्र राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. (प्रतिनिधी)