मोक्का न्यायालय : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीची टोळी गोळीबारप्रकरणी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 21:50 IST2019-04-11T21:42:41+5:302019-04-11T21:50:06+5:30

खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MCOCA Court: Guilty of firing under the infamous underworld don Ravi Pujari | मोक्का न्यायालय : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीची टोळी गोळीबारप्रकरणी दोषी

मोक्का न्यायालय : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीची टोळी गोळीबारप्रकरणी दोषी

ठळक मुद्देगुन्ह्याचा तपास मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते

नाशिक : इंदिरानगरमध्ये २०११ साली एका बांधकाम प्रकल्पावर जाऊन बिल्डरवर गोळीबार करणाऱ्या अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड रवी पुजारीच्या टोळीतील आरोपी संजय सिंग, अरविंद चव्हाण व विकासकुमार सिंग, संदीप शर्मा यांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने गुरुवारी (दि.११) दोषी धरले. खंडणीसाठी बिल्डरला धमकावत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात एक महिला व पुरुष जखमी झाले होते. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाथर्डीफाटा येथील पांडवलेणी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पावरील बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात २५ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित विकासकुमार आणि संतोषकुमार सिंग हे दोघे आरोपी शिरले. त्यावेळी तेथे कामावर असलेल्या प्रियंका पलाडकर यांनी आरोपींकडे विचारपूस केली. आरोपींनी बनाव करत पाकीट द्यायचे आहे, असे खोटे कारण त्यांना सांगितले. त्यामुळे कार्यालयातील दुस-या कर्मचारी देविका कोडिलकर या दोघांकडील पाकीट घेण्यासाठी गेल्या तसेच बांधकाम व्यावसायिक अशोक मोहनानी हेदेखील त्यावेळी तेथे आले. दरम्यान, दोघांनी स्वत:जवळील पिस्तूल काढून गोळीबार केला. यावेळी प्रियंका आणि मोहनानी हे दोघे प्रसंगावधान राखत बाजूला झाल्याने बचावले. यावेळी देविका या जोरात ओरड्यामुळे कार्यालयातील कर्मचारी रणजित बाहेर आले. तेव्हा संशयितांनी त्यांच्यावरही गोळीबार केला. या गोळीबारात देविका आणि रणजित हे दोघे जखमी झाले होते. त्यानंतर संशयितांनी तत्काळ घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार या गंभीर गुन्ह्याचा तपास मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडे वर्ग करण्यात आला.

Web Title: MCOCA Court: Guilty of firing under the infamous underworld don Ravi Pujari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.