शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

आजपासून एमबीबीएसच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 1:35 AM

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापठाच्या हिवाळी २०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सोमवार (दि.८) पासून सुरू होणार आहे. 

ठळक मुद्देराज्यभरात १६५ केंद्र : सॅनिटायझरसाठी प्रति केंद्र तरतूद

नाशिक :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापठाच्या हिवाळी २०२० सत्राच्या अंतिम वर्षाच्या सर्व आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा सोमवार (दि.८) पासून सुरू होणार आहे. या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले असून राज्यभरातील १६५ परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर व  सोडीयम हायपोक्लोराईड उपलब्ध करून देण्यासाठी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली आहे. त्यानंतर पदवी अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा मार्चच्या अखेरीस होणार आहे. तर पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात होणार असल्याचे डॉ.  अजित पाठक यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षाही ऑफलाइन पद्धतीनेच घेण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना आरोग्य विद्यापीठातर्फे विशेष कोरोना सुरक्षा कवच विमा देऊन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यावेळीही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना  करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. दरम्यान,  परीक्षेकरिता आवश्यक परीक्षा प्रवेशपत्र ऑनलाइन प्रणालीद्वारे संबंधित महाविद्यालये व विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत.पदवीपूर्व परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीनेवैद्यकीय, दंत, आयुर्वेद, समचिकित्सा, परिचर्या, भौतिकोपचार, व्यावसायोपचार, भाषा श्रवणदोष विज्ञान आदी विषयांच्या अंतिम पदवी अभ्यासक्रम परीक्षा ८ ते २६ मार्च  या कालावधीत होणार असून या परीक्षेला राज्यभरातील १६५ केंद्रांवर तब्बल १० हजार ९९५ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहे. तर  विद्यापीठाच्या वैद्यकीय, दंतरोग, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी आदी विविध विद्या शाखांच्या पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठexamपरीक्षा