शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महापौरपद खुले झाल्याने वाढणार चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 12:38 AM

मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे.

नाशिक : मुंबई येथे बुधवारी (दि.१३) काढण्यात आलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीत नाशिकचे महापौरपद हे खुले झाले आहे. त्यामुळे आता या पदासाठी प्रचंड चुरस वाढणार आहे. महापालिकेत भाजपचे पूर्ण बहुमत असले तरी राज्यातील सत्तांतर होऊन शिवआघाडीचे सरकार स्थापन झाल्यास मात्र महापालिकेत भाजपला कडवे आव्हान राहणार आहे.राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि. १३) मुंबईत सोडत काढण्यात आली. त्यात नाशिकचे महापौरपद आता खुले झाले आहे. म्हणजेच त्यात खुल्या प्रवर्गाप्रमाणेच अन्य कोणत्याही राखीव प्रवर्गातील उमेदवारदेखील अर्ज दाखल करू शकतो. २०१७ मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. त्यावेळी नाशिकचे महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होते. त्यानुसार रंजना भानसी यांची या पदावर निवड झाली. त्यांची मुदत १५ सप्टेंबर रोजी संपणार असतानादेखील विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. विधानसभा निवडणुका होताच आता महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.महापालिकेत १२० पैकी ६५ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमतामुळे या पक्षाला तसा थेट धोका नाही. मात्र, राज्यातील महाशिव आघाडीचा प्रयोग नाशिकमध्ये झाल्यास भाजपला मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. महापालिकेत शिवसेनेचे ३४, राष्टÑवादी आणि कॉँग्रेसचे प्रत्येकी सहा म्हणजे एकूण बारा, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि एक रिपाइं आठवले गटाचा नगरसेवक आहे. याची बेरीज केली तर ती ५५ पर्यंत पोहोचते. बहुमतासाठी आणखी सहा नगरसेवक आवश्यक आहेत. मात्र सध्या भाजपातील अंतर्गत वाद तसेच माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे कथित समर्थक फुटल्यास सत्ता समीकरण बदलू शकते.विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना अगोदरच शिवसेनेने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामागे महापौरपदावर असलेले शिवसेनेचे लक्ष लपून राहिलेले नाही. त्यातच राज्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी, मनसे आणि शिवसेना एकत्र आल्याने नाशिकमध्येदेखील त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळेच नाशिकमध्ये सत्तेची समीकरणे बदलू शकतात. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर आता समीकरणे जुळवली जाणार आहेत.महापालिकेत वाढली गर्दीमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोडत जाहीर होताच महापालिकेच्या राजीव गांधी भवनात अचानक नगरसेवकांची गर्दी वाढली. विधानसभा निवडणूक आणि आचारसंहिता यामुळे महापालिकेत गेल्या तीन महिन्यांपासून शुकशुकाट होता. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (दि.१३) मुंबईत सोडत होणार होती त्यास महापालिकेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी केवळ स्थायी समिती सभापती उद्धव निमसे हेच गेले होते. महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मात्र नाशिकमध्येच राहणे पसंत केले.महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्याने आता महापौरपदाची निवडणूक कधी जाहीर होते, याकडे लक्ष लागून आहे. सध्याच्या महापौरांचा कालावधी १५ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता आहे.४या निवडणुकीसाठी मनपा नगरसचिव विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना पत्र दिल्यानंतर ते निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतात. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी झाल्याने त्यात कोणत्याही प्रवर्गातील नगरसेवक त्यासाठी अर्ज करू शकतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण