शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महापौर आरक्षणाची उद्या सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:46 AM

राज्यात महाशिवराज्य आघाडीची तयारी सुरू झाल्यानंतर आता महापालिकेतदेखील सत्ता समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या आधीच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना प्रवेश देऊन तयारी सुरू केली आहे.

नाशिक : राज्यात महाशिवराज्य आघाडीची तयारी सुरू झाल्यानंतर आता महापालिकेतदेखील सत्ता समीकरणाची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेने या आधीच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना प्रवेश देऊन तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, महापौरपदासाठी उद्या (दि. १३) रोजी सोडत जाहीर होणार आहे.नाशिक महापालिकेतील १२२ पैकी ६५ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे यापक्षाचे बहुमत आहे. शिवसेनेचे ३४ निवडून आलेले नगरसेवक असून, त्यांचा मुळातच भाजपला पाठिंबा नाही. मध्यंतरी शिवसेनेने बराच पाठपुरावा करून दोन विषय समित्यांचे उपसभापतिपद मिळवले असले तरी त्यानंतर मात्र भाजपने त्यांना महत्त्वाची पदे दिलेली नाही. दरम्यान, विधानसभा निवडणूक युतीने लढवित असतानादेखील भाजप-सेनेत विसंवाद दिसत होता. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या आणि त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडे जाऊन उमेदवारी मिळवून पराभूत झालेल्या बाळासाहेब सानप यांना शिवसेनेने प्रवेश दिला आहे. त्यावेळीच राज्यात भाजप आणि सेनेत वाद झाल्याने राजकीय वातावरण बदलले गेले आहे. त्याचा परिणाम महापालिकेच्या सत्तेवर होण्याची चिन्हे आहेत.नाशिकच्या महापौरपदाची निवडणूक १५ डिसेंबरच्या आता होणे बंधनकारक आहे. तथापि, अद्याप त्याबाबत आरक्षणाची सोडत निघालेली नाही. त्यानंतर मात्र राजकीय हालचाली गतिमान होत्या. महापालिकेत १२२ पैकी दिलीप दातीर आणि सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीनामा दिल्याने एकूण १२० नगरसेवक आहेत. बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. भाजपकडे ६५ नगरसेवक असले तरी त्यातील काहीजण सानप समर्थक आहे, तर काहीजण सत्तेस असूनही कामे होत नसल्याने नाराज आहेत. अशा किमान सहा नगरसेवकांनी महाशिव आघाडीला साथ दिली, तर महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. सध्या त्या दृष्टीनेच शिवसेना बघत आहे.अनेकांची घरवापसी शक्यराज्यात सत्तांतर झाले किंवा नाही झाले तरी स्थानिक पातळीवर सत्तांतर होऊ शकते. त्याचे कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील आघाडी युती फारशी गांभीर्याने घेतली जात नाही. त्यातच भाजप अंतर्गत खदखद असलेले अनेक नगरसेवक आता दोन वर्षांवर महापालिका निवडणुका आल्याने भूमिका बदलू शकतील. विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्टÑवादीला अनुकूल वातावरण असल्याचे जिल्ह्यात दिसून आल्याने सध्या भाजपमध्ये असलेले मूळ कॉँग्रेस-राष्टÑवादीचे नगरसेवक पुन्हा कॉँग्रेस आघाडीकडे परतण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.महापालिकेतील पक्षीय बलाबलएकूण निर्वाचित नगरसेवकांची सध्याची संख्या १२० आहे. बहुमतासाठी ६१ नगरसेवकांची गरज आहे. यात भाजपा- ६५, शिवसेना- ३४, कॉँग्रेस- ६, राष्टÑवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३, रिपाइं- १ याप्रमाणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPoliticsराजकारण