विद्यार्थ्यांना स्वेटरद्वारे मायेची उब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:23 IST2020-12-22T18:22:42+5:302020-12-22T18:23:23+5:30
कळवण : या आदिवासी बहुल भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे (स्वेटर ) वाटप करून एक स्त्युत्य उपक्रम राबविला.

नाशिक जिल्हा युवासेनेच्या वतीने देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते चौथीतील ६५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
कळवण : या आदिवासी बहुल भागातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे (स्वेटर ) वाटप करून एक स्त्युत्य उपक्रम राबविला.
नाशिक जिल्हा युवासेनेच्या वतीने देसराणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते चौथीतील ६५ विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी युवासेना संपर्कप्रमुख निलेश गवळी, युवासेना जिल्हाध्यक्ष आदित्य केळकर, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष नारायण हिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, उपजिल्हाप्रमुख दशरथ बच्छाव, भाजपाचे महेंद्र हिरे, पंडित पवार, उपतालुकाप्रमुख विनोद भालेराव, युवासेना तालुका अधिकारी मुन्ना हिरे, कळवण शहर अधिकारी सुनिल पगार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.