कमाल तपमान ३०.५ : नाशकात दिवसभर दाटले ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 20:56 IST2018-03-15T20:56:50+5:302018-03-15T20:56:50+5:30
मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता.

कमाल तपमान ३०.५ : नाशकात दिवसभर दाटले ढग
नाशिक : मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल तपमानाचा पारा ३६ अंशाच्या पुढे सरकल्याने नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळांचा सामना करावा लागत होता; मात्र गुरूवारी (दि.१५) अचानकपणे सकाळपासून वातावरणात बदला झाला. ढगाळ वातावरणामुळे तपमानाचा पारा घसरला.
मार्च महिन्याच्या पहिला आठवडा नाशिककरांसाठी हॉट राहिला. काही दिवस तपमानाचा पारा खाली आला; मात्र पुन्हा मागील शनिवारपासून पारा चढल्याने उष्मा वाढला होता. गुरूवारी सकाळपासून शहरावर दाटलेले ढग संध्याकाळपर्यंत कायम राहिल्याने उन्हाच्या झळांपासून नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. ढगाळ हवामान असूनही उष्मा फारसा जाणवला नाही, कारण वाऱ्याचा वेग चांगल्याप्रकारे दिवसभर टिकून होता. काही भागात वाºयाचा वेग मंदावल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला; मात्र दीर्घवेळ वाº-याचा वेग मंदावलेला राहिला नाही. त्यामुळे ढगाळ हवामानासा फारसा परिणाम नागरिकांवर झाला नाही. दाटून आलेले ढग दिवसभर कायम राहिले होते. शहराचे गुरूवारी कमाल तपमान ३०.५ अंश इतके तर किमान तपमान १९.८ अंशापर्यंत वाढले. किमान तपमानात वाढ झाल्याने वा-याचा वेगही टिकून राहिला होता.
ढगाळ हवामानामुळे शेतकरी वर्गामध्ये काही प्रमाणात चिंतेचे वातावरण पसरले आहे. अचानकपणे ढगाळ हवामान झाल्याने शेतातील गहू, द्राक्षे यांसारख्या पीकांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती शेतक-यांमध्ये व्यक्त केली जात आहे. ढगाळ हवामान पुढील काही दिवस राहू नये, अशीच शेतक-यांची अपेक्षा आहे; मात्र लहरी निसर्गापुढे सारेच हतबल असून निसर्ग आपले रंगरुप कधीही बदलत असल्याने हवामानातही तितकाच वेगाने बदल होत असल्याचा सध्या नागरिकांना अनुभव येत आहे.