मातोश्री सोनवणे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 00:00 IST2021-07-17T23:15:41+5:302021-07-18T00:00:57+5:30
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसुलचा इयत्ता १० वीचा बोर्ड परीक्षा निकाल १०० टक्के लागला.

मातोश्री सोनवणे विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के
अंदरसुल : येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे माध्यमिक विद्यालय अंदरसुलचा इयत्ता १० वीचा बोर्ड परीक्षा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयाने १०० टक्के निकालाची दरवर्षीची परंपरा जपली.
९० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. यामध्ये २३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, ४४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व २३ विद्यार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. अभिजीत बाळासाहेब मोरे याने ५०० पैकी ४७६ गुण तसेच ९५.२० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला. पायल शरद सोनवणे हिने ४७५ गुण मिळवून द्वितीय क्रमांक, वैष्णवी श्रावण हिने ४७१ गुण मिळवून तृतीय क्रमांक, साक्षी संजय धनगे हिने ४६३ गुण मिळवून चतुर्थ क्रमांक, पायल विजय भालेराव हिने ४५५ गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.